हर चेहरे पे नकाब है..
हर चेहरे पे नकाब हैं ........ अभिनेता सुशांतसिंग राजपूत गेला...., श्रद्धांजली! आत्महत्या केली त्यानं. सगळीकडं दुःख व्यक्त झालं आणि होतंय. समाज माध्यमं व्याकुळ झाली. अनेकांना तर आपल्या घरातील कुणी गेल्याचं दुःख झालं. होणारच! कुठल्याही संवेदनशील मनाला अशा वेळी यातना होणार हे स्वाभाविक आहेच. तसं पाहिलं तर कुणाचाही प्राण जाणं ही वेदनादायी बाब आहे पण रोज शेतकरी आत्महत्या करतो तेंव्हा किती जण कळवळतात? हा सवालही समाजमाध्यमांवर उपस्थित झाला आहे. कुणीही आत्महत्या करतो ते आनंदानं नक्कीच नाही. आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा, पळून जाणे वगैरे वगैरे बरंच काही बोललं जातं...पण हे बोलण्यापुरतं आणि पुस्तकातल्या पानात छापण्यापुरतंच असतं. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच ते कळतं. मी तर म्हणेन, आत्महत्या हे भेकडाचं नव्हे तर धाडसाचं काम आहे. पायाखाली किडा मुंगी आली तरी आपण कळवळतो तिथं चक्क स्वत...