Posts

Showing posts from September, 2020

साॅरी ‘आमिताभ’ जी..!

Image
  दुनियादारी    ‘हे घ्या पेढे! पाेरानं नांव काढलं बगा.... चांगलं अठठयाएेंशी टक्के मार्क  मिळऊन पाेरगं पास झालं!’ आमचा एक मित्र भल्या सकाळीच येऊन माझं ताेंड गाेड करीत हाेता... मधुमेहाचा आजार असला तरीही मी त्यातला अर्धा  पेढा टाकला ताेंडात... कुणाच्या आनंदात आपण कशाला विरझण घालायचं? आमचा हा मित्र आपल्या पुत्राचे गाेडवे गात हाेता..., वाटलं, चांगली गाेष्ट आहे, असेल ह्याचा मुलगा हुशार! आमच्या गप्पा चालल्यात तेवढ्यात अजून एक मित्र हजर! एका शाळेतला हा शिक्षक.. त्यानंही त्याच्या मुलाच्या काैतुकाचे पेढे दिले अन् त्याच्या आधी आलेल्या आमच्या या मित्राला समजाऊ लागला...‘नका नाराज हाेऊ.. पुढच्या वर्षी हाेईल पास तुमचा मुलगा..’ आमचा हा मित्र जाम उघडा पडला हाेता... पाेरगं नापास हाेऊनही दुनियेला दाखविण्यासाठी ही किती लबाडी! दुनियेला फसवताेय असं वाटून घेणारी ही मंडळी स्वत:च फसतात हाे..!      आमच्या एका धार्मिक चित्रपटाचं चित्रीकरण पंढरपुरात करायचं हाेतं. चित्रपट धार्मिक असल्यानं महिला कलाकार ही प्रेक्षकांच्या परिचयाची नसावी असा निर्मात्याचा आणि माझाही आ...

पराभवच ..., पण कुणाचा ?

Image
       दुनियादारी     रेल्वे स्टेशन जवळ आल्यामुळं तसा रेल्वेचा वेग बराच कमी झाली हाेता परंतु मध्येच करकच्चून ब्रेक दाबत रेल्वे एकदम थांबली. काय हाेतंय हे कळायच्या आधीच रेल्वेतील प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पडले तर वर ठेवलेले कुणाचे सामान कुणाच्या अंगावर पडले. दरम्यान रेल्वे इंजिनाच्या समाेर गर्दी जमू लागली हाेती. साधारण ४५ वर्षांचं वय असणारा एक उंचापुरा, धिप्पाड माणूस रेल्वेरूळावर आडवा पडलेला! त्याला आत्महत्या करायची हाेती. रेल्वे थांबली नसती तर एव्हाना सगळंच संपलेलं असतं!       ‘मरायला हीच जागा सापडली का?.. आधीच गाडी तासभर लेट झालीय!’ गर्दीतल्या एकानं त्याला खडसावलं ताेवर दुसरा म्हणाला, ‘आरं मंग लायटीच्या खांबावर चढायचं की!’...जाे ताे त्याला आत्महत्या करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत हाेता.., ताे मात्र शांत! एकटक नजर, निर्वीकार..! गाडीला आणखी उशीर हाेताेय याची प्रवाशांना चिंता.. गर्दी बाजूला सारत मी पुढं गेलाे, त्याच्या डाेक्यावरून मायेचा हात फि रवला आणि त्याचा हात धरून त्याला बाजूला घेतलं... माझ्या...

--- कव्वे काे ‘बाप’ बनायें..!

Image
 गेल्या काही दिवसांपासून पक्ष पंधरवड्याच्या निमित्तानं  दिवंगत आई बापाला जाम मेजवानी चालू आहे. पक्ष पंधरवडा आला की हे सगळं आलंच! परंपरा, रिवाज वगैरे सगळं ठिक आहे हाे, पण यातील किती जणांनी आई बाप हयात असताना त्यांना जपलंय ते पहा एकदा! मेल्यावर त्यांच्या नावानं कावळ्यांना खाऊ घालण्यापेक्षा जिवंतपणी आई बापाला घाला ना..! त्यांना कधी चटणी भाकरी दिली नाही अन् कावळ्यांना लाडू, पुरणपाेळी! या म्हाताऱ्यांना खाण्यापिण्यापेक्षा अन् पैशापेक्षा हवं असतं तुमचं प्रेम.. अन् ते मिळतच नाही. श्राध्दाला मात्र सगळं काही! कावळ्यांना देता तेवढं जरी आधीच आई बापाला दिलं असतं तर? संत तुकाेबा म्हणतात,                     ‘भुके नाही अन्न,                     मेल्यावरी पिंडदान...                    हे ताे चाळवाचाळवी,                    केली आपणाची ठेवी’  माणूस गेल्यावरच त्...

हरवलेत ‘गुरूजी’ अन् बेपत्ता ‘विद्यार्थी ’...!

Image
     ‘सर, हे घ्या पेढे!’ कालच संध्याकाळी एक गुरूजी, (अर्थात आजच्या भाषेतले शिक्षक)  घरी आले अन् माेठ्या आनंदानं पेढे द्यायला लागले. आता पेढे म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी! मी आपलं विचारलं, काय हाे गुरूजी, ‘मुलगा झाला काय?’ गुरूजी छाती फुगवत म्हणाले, ‘नाही हाे... मला ‘शिक्षक दिनाचा’ पुरस्कार मिळालाय... त्याचे हे पेढे!’ त्यांचं अभिनंदन तर करायलाच हवं हाेतं.. मी ते केलंही पण त्यांच्या जवळ जाताच  भपकन् वास आला... दारूचा हाे! गुरूजींना विचारलं, ‘अहाे, हे काय?’ गुरूजी हसत म्हणाले, ‘काही नाही हाे.. आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांनी पार्टी  मागितली... ‘घेतली’ आपली थाेडीशी!’ कसलाही अपराधी भाव नव्हता या ‘गुरूजी’ च्या चेहऱ्यावर !        मला माझ्या लहानपणीचे गुरूजी आठवले. धाेतर नाहीतर पायजमा... चेहऱ्यावर सतत सात्विक भाव! अख्खा गावगाडा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणं  चालायचा! गावातले सगळे महत्वाचे निर्णय  हे ‘गुरूजी’ घेत अन् सारं गाव त्याला मान्यता द्यायचं. आता धाेतर गेलं, पायजमा गेला... जीन पॅट, शर्टचा ...