Posts

Showing posts from August, 2020

श्रीमंत मनाचा भिकारी

Image
    माणूस गरीब असला की त्याला नाती गोती काही नसतात! मित्रमंडळी, पाहुणे रावळे या सगळ्यापासून तो खूप दूर असतो! माणूस जन्माला आला की जन्मासोबत नातीही जन्माला येत असतात पण त्याचा खिसा रिकामा झाला की जवळच्या माणसांची मनंही रिकामी होतात.  कुणी मोठा माणूस असला की बळजबरीनं त्याच्याशी नातं सांगतात, कुणी म्हणतं "हे माझे वर्गमित्र"  कुणी म्हणतं  आम्ही बालमित्र ! कसलाच काही संबंध नसतो पण बळजबरीचं नातं जोडतात आणि आपले आईवडील अडगळीला टाकतात. चुकून कुणा तथाकथित मोठ्या माणसासोबत असताना फ़ाटका बाप जवळ आला तर त्याला ओळख द्यायला तयार होत नाहीत त्यांनीच वाढवलेली मुलं ! घरातला कुणी नौकर आहे असं सांगायलाही मागे पुढे पाहत नाहीत. फाटक्या कपड्यातला आणि तुटक्या चपलेतल्या बापाला 'बाप' म्हणायची लाज वाटते हो ! मुलाला लहानाचं मोठं करता करता त्याच्या अंगावरच्या कपड्याने ठिगळ लावायलाही त्याला उसंत मिळालेली नसते आणि याच्यावर एवढे पैसे खरंच केलेले असतात की, तुटलेली चप्पल शिवायलाही त्याच्या फाटक्या खिशात दहा वीस रुपये उरलेले नसतात. पण त्याला काय? खोट्या दुनियेत वावरताना त्याला ...