साॅरी ‘आमिताभ’ जी..!
दुनियादारी ‘हे घ्या पेढे! पाेरानं नांव काढलं बगा.... चांगलं अठठयाएेंशी टक्के मार्क मिळऊन पाेरगं पास झालं!’ आमचा एक मित्र भल्या सकाळीच येऊन माझं ताेंड गाेड करीत हाेता... मधुमेहाचा आजार असला तरीही मी त्यातला अर्धा पेढा टाकला ताेंडात... कुणाच्या आनंदात आपण कशाला विरझण घालायचं? आमचा हा मित्र आपल्या पुत्राचे गाेडवे गात हाेता..., वाटलं, चांगली गाेष्ट आहे, असेल ह्याचा मुलगा हुशार! आमच्या गप्पा चालल्यात तेवढ्यात अजून एक मित्र हजर! एका शाळेतला हा शिक्षक.. त्यानंही त्याच्या मुलाच्या काैतुकाचे पेढे दिले अन् त्याच्या आधी आलेल्या आमच्या या मित्राला समजाऊ लागला...‘नका नाराज हाेऊ.. पुढच्या वर्षी हाेईल पास तुमचा मुलगा..’ आमचा हा मित्र जाम उघडा पडला हाेता... पाेरगं नापास हाेऊनही दुनियेला दाखविण्यासाठी ही किती लबाडी! दुनियेला फसवताेय असं वाटून घेणारी ही मंडळी स्वत:च फसतात हाे..! आमच्या एका धार्मिक चित्रपटाचं चित्रीकरण पंढरपुरात करायचं हाेतं. चित्रपट धार्मिक असल्यानं महिला कलाकार ही प्रेक्षकांच्या परिचयाची नसावी असा निर्मात्याचा आणि माझाही आ...